केळी चिप्स व अन्नप्रक्रिया या प्रशिक्षणाचे आज दि. ५ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले होते. त्याचा शुभारंभ आज करण्यात आला.
केळी चिप्स व अन्नप्रक्रिया या प्रशिक्षणाचे आज दि. ५ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले होते. त्याचा शुभारंभ आज करण्यात आला.
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क
केळी चिप्स व अन्नप्रक्रिया या प्रशिक्षणाचे आज दि. ५ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले होते. त्याचा शुभारंभ आज करण्यात आला.
सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया व युथ बिल्ड फाउंडेशन यांच्या तर्फे केळी चिप्स व अन्नप्रक्रिया याबाबतचे प्रशिक्षण १ महिन्यासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने आज येथील ओमकारेश्वर महादेव मंदिर समोरील श्री देविदास शिंदे यांच्या हॉलमध्ये या प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला. यावेळी पाहुण्यांचा सत्कार राईज अँड शाईन कंपनीचे केळी चे रोप देवून करण्यात आला.
यामध्ये केळी पासून किती पदार्थ बनवले जातात तसेच अन्न प्रक्रिया उद्योगावर आधारित किती प्रकार बनवले जातात याचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात युथ बिल्ड फाउंडेशन चे सर्वेसर्वा डॉ. प्रदीप बावडेकर यांनी उद्योग कसा करावा ? उद्योजकाचे गुण कसे असावे, उद्योजकांनी व्यवसाय करताना कुठल्या गोष्टींचे बाबींचे गांभीर्य ठेवले पाहिजे. तसेच उद्योजकामध्ये असणारे गुणधर्म याबाबत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर युथबिल्ड फाउंडेशन चे डायरेक्टर डॉ. प्रदीप बावडेकर, मिमा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे सहाय्यक संचालक डॉ. अमित पाटील, श्री. हेमंत ठोंमरे, श्री. शुभम पाटील हे होते.
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी देविदास शिंदे, शारदा पाटील, विनिता वैद्य, एकता पाटील, पवन पाटील, रोहित पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार विजय पाटील यांनी केले.