वीस किलो डिंक जप्त ,वनविभागाची कारवाई

वीस किलो डिंक जप्त,वनविभागाची कारवाई

Mar 31, 2024 - 13:30
Mar 31, 2024 - 13:33
 0
वीस किलो डिंक जप्त ,वनविभागाची कारवाई

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर

अहिरवाडी वन क्षेत्रातील अवैधरित्या सलई डिंक वाहतूक करीत असतांना एक मोटर सायकल पकडली आहे. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला आहे. सदर डिंक वन विभागाने जप्त केला आहे.

या बाबत वृत्त असे की, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर (प्रा) यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार रावेर वनक्षेत्रातील परिमंड अहिरवाडी मधील नियतक्षेत्र पडल्या मधील कं. नं. ०३ मध्ये गस्त करीत असताना एक मोटार सायकल एम.पी १२ बीए ७२०२ सी.टी.१०० कंपनीची ही अवैध सलई डिंक वाहतूक करतांना मिळून आली. त्यात साधारण वीस किलो सलई डिंक जप्त केला असून सदर आरोपी सलई डिंक व मोटार सायकल फेकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

आरोपीचा पाठलाग केला असता आरोपी मिळून आला नाही, तरी सदरचा वन गुन्हा हा वनरक्षक पाडले खु. यांच्या प्र.रि.क्रं ०१/२०२४ दि.२९ नोंदविला असून या सलई डिंक वीस किलो असून डिंकाची किंमत २ हजार २०० रुपये इतकी असून मोटारसायकल एकची बाजारभाव अंदाजीत रक्कम- २५ हजार रुपये इतकी आहे. तरी सर्व मिळून ऐकून रक्कम २७ हजार २०० इतकी आहे. तरी सदरची कार्यवाही ही अजय नारायण बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, वनरक्षक सुपडू सपकाळे, वनरक्षक रमेश भुतेकर यांचा सहभाग होता. सदरची कार्यवाही ही उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर वन गुन्ह्याबाबत पुढील तपास वनपाल अहिरवाडी यांचे मार्फत सुरू आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील