पिक विमा लाभापासून प्रलंबित असलेल्या ९६९० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रु.५३.७० कोटी लाभ - खासदार श्रीमती रक्षाताई खडसे*
पिक विमा लाभापासून प्रलंबित असलेल्या ९६९० शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रु.५३.७० कोटी लाभ - खासदार श्रीमती रक्षाताई खडसे*
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
पुनर्रचित हवामानावर आधारित *“फळ पिक विमा योजना आंबिया बहार”* सन २०२२ मध्ये एकूण ७८००० शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित असलेल्या ५४००० शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पिक विम्याच्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार होता, त्यातील ४५००० शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, अनेक शेतकऱ्यांना टप्याटप्याने लाभ मिळणार होता. त्यातील काही महिन्यापूर्वी ९००० शेतकऱ्यांना एकूण *रु.३०,७२,७२,५७७/* रक्कम वितरीत करण्यात आली असून, आज *९६९०* शेतकऱ्यांना आज *रु.५३,७०,४२,२४५/-* इतका पिक विम्याचा लाभ मिळणार असल्याबाबत माहिती *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी दिली.
विमा कंपनी मार्फत ११०२२ शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ नाकारण्यात आला होता, त्याबाबत *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून, याबाबत जिल्हास्तरावर कमिटी स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय देणे बाबत मागणी केली होती. त्यानुसार, पिक विम्याचा लाभ नाकारण्यात *११०२२* शेतकऱ्यापैकी ८१९० शेतकऱ्यांनी दाद मागून पुरावे सादर केल्यानंतर *६६८६* शेतकऱ्यांना पिक विम्याच्या प्रलंबित लाभासाठी पात्र ठरवण्यात येऊन, त्यांना लाभ मिळालेला आहे. तसेच पिक विम्याचा लाभ प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांना आजपावतो लाभ मिळाला असून, राहिलेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा लोकसभा निवडणुकीनंतर लगेच प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याबाबत यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या तर्फे *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी यावेळी *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, मंत्री श्री.गिरीषजी महाजन व कृषिमंत्री श्री.धनंजयजी मुंडे* यांचे आभार मानले.