शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोघं अल्पवयीन मुलांचा तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू,

शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोघं अल्पवयीन मुलांचा तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू,

Apr 16, 2024 - 01:19
Apr 16, 2024 - 01:30
 0
शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोघं अल्पवयीन मुलांचा तापी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू,

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर

यावल तालुक्यातील शिरागड (लहान गड) येथे देवीच्या दर्शनासाठी जळगाव येथील दोन तरुण सप्तश्रृंगी देवी मंदिराजवळील तापी नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली.

प्रथमेश शरद सोनवणे. वय १७, रा. वाघ नगर, जळगाव व रोहन काशिनाथ श्रीखंडे, वय १७, रा. रामानंद नगर, जळगाव. असे मयत मुलांची नाव असून त्यांनी नवीन दुचाकी घेतली होती. हि दुचाकी घेऊन ते यावल तालुक्यातील शिरागड येथे सोमवार १५ एप्रिल रोजी गेले होते. 

दर्शन आटोपल्यावर त्यांनी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास सप्तश्रृंगी देवीच्या मंदिराजवळ तापी नदी पात्रात अंघोळ करण्यासाठी गेले मात्र नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.

या बाबत आजूबाजूच्या ग्रामस्थांनी यावल पोलीस स्टेशनला माहीती दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी यावल ग्रामीण रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी रवाना केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही मुलांना मृत घोषित केले. 

या बाबत यावल पोलीसस्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, भरत कोळी करीत आहेत. दरम्यान, दोन्ही युवकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश करीत हंबरडा फोडला.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील