*डी वाय एस पी अन्नापुर्णा सिंग यांनी पकडले अवैधरित्या म्हशी वाहतूक करणारे ६ ट्रक,सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल १२ आरोपी अटक,१०५ म्हशींसह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त"

*डी वाय एस पी अन्नापुर्णा सिंग यांनी पकडले अवैधरित्या म्हशी वाहतूक करणारे ६ ट्रकसावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल १२ आरोपी अटक,१०५ म्हशींसह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त"

Mar 31, 2024 - 14:03
 0
*डी वाय एस पी अन्नापुर्णा सिंग यांनी पकडले अवैधरित्या म्हशी वाहतूक करणारे ६ ट्रक,सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल १२ आरोपी अटक,१०५ म्हशींसह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त"

अनेक दिवसांपासून अशा प्रकारे सुरु असलेली जनावरांची वाहतूक करणारे ट्रक या चोरट्या मार्गाने सर्रासपणे सावदा शहरांतून थेट रेल्वे स्टेशन रस्त्याने पुढे मार्गस्थ होतात.मात्र सध्या डिवायएसपी अन्नापुर्णा सिंग फैजपूर यांनी सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ६ वाहनांना पकडल्याची ही पहिली मोठी घटना असल्याचे चर्चिले जात आहे.तरी हा अवैध व्यवसाय थेट शांततेसाठी धोकादायक आहे.

याकडे सावदा पोलिसांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे."

------------------------------------------------------------

मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क

सावदा प्रतिनिधी 

सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रावेर ते पाल रस्त्यावर खिरोदा फॉरेस्ट नाक्याचे खाली रोडावर दि.२८ मार्च रोजी रात्री १-३० वाजेच्या सुमारास अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ६ आयशर ट्रक पकण्यात आले.यात अतिशय निर्दयीपणे दाटीवाटीने भरलेल्या एकूण १०५ काळ्या रंगाचे लाहन मोठया म्हशी आढळून आले.या जप्त मुद्देमालची एकूण किंमत ६९,६७.६०० लाख इतकी असून, सर्व म्हशी रावेर येथील गोशाळेत पाठवण्यात आले.यासंदर्भात पोना/निलेश जगतराव बाविस्कर यांनी सावदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने बेकायदेशीर जानावरांची वाहतूक करणारे१)जहिरखान वाहेदखान वय-४६ रा.गंगापुरा आष्टा जिल्हा- सिहोर(मध्य प्रदेश),२)राशिद रईस कुरेशी वय-२२ रा.गंगापुरा आष्टा जिल्हा-सिहोर(मध्य प्रदेश), ३)अकबर सिकंदर खान वय-४२ रा.सियापुरा जिल्हा देवास(मध्य प्रदेश),४)वसिम रजाक कुरेशी वय-३५रा.गंगापुरा आष्टा जिल्हा- सिहोर(मध्य प्रदेश),५)सलमान अहेमद नूर वय-३४रा.पठाणवाडी सारंगपुर जिल्हा राजगड मध्ये प्रदेश,६)अफसर अबरार कुरेशी वय-३८ रा.नजरवाडीसमोर आष्टा जिल्हा-सिहोर(मध्य प्रदेश),७) आझाद बाबु शेख वय-४५रा. ईटावा जिल्हा-देवास मध्य प्रदेश)फारुख लतीब कुरेशी वय-२८ रा.नेतवाडा ता.जावर जिल्हा-सिहोर(मध्य प्रदेश),९) साईद शहजाद खान वय-३६रा. गजरागेट चौराहा देवास मध्य प्रदेश,१०)परवेज सादीक वेग वय-२२रा.गोया ता.नागदा जिल्हा-देवास(मध्य प्रदेश),११) अजमदखान रईस खान वय-२६ रा.अल्लीपुर आष्टा जिल्हा-सिहोर (मध्य प्रदेश),१२)नजिम नईम कुरेशी वय-२९काजीपुरा आष्टा जिल्हा-सिहोर(मध्य प्रदेश)यांचे विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधि.१९६०चे कलम११(१), ११(१)(C),११(१)(D),११(१) (G),११(१)(J), प्राण्यांचा परीवहन नियम १९७८चे कलम५६महाराष्ट्र पोलीस अधि.१९५१चे कलम११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील