सावद्यात ४४ वर्षीय इसमाची दगडाने ठेचून निघृण हत्य! "अवघ्या ४ तासात पोलिसांकडून आरोपींना अटक"
सावद्यात ४४ वर्षीय इसमाची दगडाने ठेचून निघृण हत्य! "अवघ्या ४ तासात पोलिसांकडून आरोपींना अटक"

मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
सावदा प्रतिनिधी
सावदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे १ कि.मी.च्या अंतरावर कोचुर रोडवरील रस्त्या लागत असलेले लोकेश सुभाष बेंडाळे रा.सावदा यांचे शेत गठ नं.६५६ येथील बांधलेल्या खोली क्रं.२ मध्ये एका पुरुषाची दगडाने ठेचून हत्या झाल्याने सावदा शहर व परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की,रावेर तालुक्यातील सावदा येथे कोचुर रोडवर असलेल्या रविंद्र बेंडाळे यांच्या शेतात रखवालदार असलेल्या शोभाराम रीचू बारेला उर्फ सुरमा भोपाली.वय ४४ वर्षे.मूळ रा. मध्यप्रदेश.याचा शेतात बांधलेल्या खोलीत रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने तोंडावर डांबर खडीच्या पक्क्या दगडाने ठेचून हत्या केली.तसेच त्याच्या छातीवर भाला मोठा दगडही ठेवला आहे.याची माहिती मिळताच सावदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.सदरील घटना दि.२९ मार्च रोजी रात्री ९ ते संकाळी ७-४५ वाजेच्या सुमारास घडली असावी.या बाबत आज दि.३० मार्च रोजी सावदा पोलिस ठाण्यात गुरनं.६३/२०२४ भादवी कलम ३०२ प्रमाणे अनोळखे इसम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पंरतू या गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिसांनी जलदगतीने तपास चक्र फिरवून अवघ्या ४ तासात दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली.तरी मृत व आरोपी यांच्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरून मृतास झोपेत असताना त्याचे डोक्या दगड टाकून खुन केल्याची कबुली आरोपी नामे सुकलाल रतन लोहारे रा.नेपानगर,व अर्जून मुन्ना आवासे रा.बुऱ्हानपूर(मध्य प्रदेश)यांनी दिली.सदर गुन्ह्याच्या तपासात महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगाव,अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव,राजकुमार शिंदे उप. विभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर याचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे जालिंदर पळे सहा.पोलीस निरिक्षक यांनी पोउपनि अमोल गर्ने,सफी.संजय देवरे,पोहेको विनोद पाटील, पोहेको यशवंत टहाकळे,पोहेको देवेंद्र पाटील,पोहेको विनोद तडवी,पोकों.प्रकाश जोशी, पोकों.किरण पाटील याचे पथक तयार करुन गुन्ह्याबाबत कोणत्याही प्रकारची माहीती घटनास्थळावर उपलब्ध नसतानाही वरील प्रमाणे त्वरीत हालचाल व चौकशीकरुन चार तासाचे कालावधीत आरोपीस निष्पन केले व त्याना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे.या गुन्ह्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखा कडिल अधिकारी व पो.अंमलदार, अंगुली मुद्रा तंज्ञ,फॉरेन्सिक पथक,श्वान पथक यांनी तपासात सहकार्य केले.