आमच्याकडे रावेर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार आहे" - अमोल जावळे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l "रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही विस्तृत ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे, ज्यात प्रत्येक समाजाच्या प्रगतीची पूर्ण हमी आहे. मतदारांचा आशीर्वाद मिळाल्यास रावेरचा चेहरा बदलून दाखवू. मला एक संधी द्या, आपण सर्वांच्या विकासाचे स्वप्न साकार करू," असे महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे म्हणाले.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
"रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही विस्तृत ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे, ज्यात प्रत्येक समाजाच्या प्रगतीची पूर्ण हमी आहे. मतदारांचा आशीर्वाद मिळाल्यास रावेरचा चेहरा बदलून दाखवू. मला एक संधी द्या, आपण सर्वांच्या विकासाचे स्वप्न साकार करू," व माझ्याकडे रावेर विधानसभा क्षेत्राच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे असे महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी सांगितले
अमोल जावळे यांनी यावल तालुक्यातील अंजाळे, टाकरखेडा, वाघळूद, चिखली, बोरावलं, भालशिव, पिप्री, निमगाव, राजोरा आणि रावेर तालुक्यातील रसलपूर, भातखेडा, रमजीपूर, खिरोदा प्रगणे रावेर, बक्षीपूर आदी गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार केला. गावोगावी रांगोळ्या काढून मतदारांनी जावळे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
मी भाजपाचे विचार, विकासाची परंपरा, आणि संपूर्ण मतदारसंघाच्या समतोल विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. माझ्या प्रचारात भाजपसह शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजितदादा गट), रिपब्लिकन पक्ष आदी पक्षांचे कार्यकर्ते मनापासून सहभागी झाले आहेत. पक्षाचे नेतृत्व, कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांचा आशीर्वाद यांच्या बळावर मी विजय मिळवणारच, याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही," असे अमोल जावळे यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी सुरेश धनके, हिरालाल चौधरी, पी.के. महाजन, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, गोपाळ नेमाडे, सागर भारंबे, हरलाल कोळी, अहमद तडवी, जितू पाटील, उमाकांत महाजन, मिलिंद वायकोळे, महेश पाटील, विजय महाजन, रवींद्र पाटील, महेश चौधरी, चेतन पाटील, राजेंद्र पाटील, सुनील महाजन, लीलाधर महाजन, सुनील पाटील, वासुदेव नरवाडे, गौरव पाटील आणि वाय. डी. पाटील यांसह महायुतीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.