रावेरच्या पूर्व भागात धनंजय चौधरी यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर पूर्व भागातील मतदारांनी धनंजय चौधरींना दिले निवडून आणण्याचे आश्वासन

Nov 15, 2024 - 08:21
 0
रावेरच्या पूर्व भागात धनंजय चौधरी यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर  l

 परंपरा सेवेची ध्यास विकासाचा या ब्रीद वाक्याच्या माध्यमातून  महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांना प्रचार दौऱ्यात मतदारांनी निवडून आणण्याचे आश्वासन दिले आहे. रावेर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा गुरुवारी रावेर तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार दौरा होता. यावेळी प्रचार दौऱ्याला मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवार चौधरी यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर महिलांनी औक्षण करीत आशीर्वाद दिले. 

   रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी रावेर तालुक्यातील कर्जोत, अहिरवाडी, निरुळ,पाडळे बुद्रुक, पाडळे खुर्द, मोहगण, पिंप्री , मंगरुळ, जुनोने , केऱ्हाळा खुर्द, केऱ्हाळा बुद्रुक, भोकरी या गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला. मतदारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले. प्रचार फेरीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यावेळी सोपान पाटील, राजू सवरणे, नरेंद्र पाटील, लियाकत जमादार, योगेश पाटील, दिलरुबाब तडवी, निरुळ येथील गोपाल पाटील, समाधान खैरे, प्रकाश खैरे, साहेबराव खैरे, संदीप साइमिरे, रमेश पाटील, बाळकृष्ण पाटील, कर्जोत येथील शरद पाटील, मनोज पाठक, सतीश बढे, शेख शफी शेख रफीउद्दीन, राजू तडवी, वसीम तडवी, विजय ससाणे, काशीनाथ ससाणे, शे साजिद शे सत्तार, शेख बिस्मिल्ला पाडळे येथील गुलशार तडवी, आसिफ तडवी, अरमान तडवी, दगडू तायडे,मनोहर घेटे, मयूर महाजन, ईश्वर महाजन, रशीद तडवी, गणेश रायपुरे, छबू तडवी, जसाबई तडवी, अल्लाबक्ष तडवी मनोज तडवी, करीम तडवी, नथू तडवी, लतीफ तडवी अहिरवाडी येथील चेतन चौधरी, नितीन चौधरी, भास्कर वाघ, विशाल वाघ, कल्याण पाटील, अनवर तडवी, जितेंद्र वाघ, उदय वाघ, किशोर चौधरी, मुन्ना पाटील, लतीफ तडवी, मयूर सावळे, ईश्वर वाघ, सुभाष चौधरी, राहुल लाहसे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संखेने उपस्थित होते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील