विकासाचे व्हीजन असलेल्या धनंजय चौधरी यांना धनगर समाजाचा पाठिंबा मिळाल्याने विजयश्री निश्चित
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l -विकासाचे व्हीजन असलेले रावेर तालुक्यातील कॉँग्रेसचे युवा उमेदवार धनंजय चौधरी यांना रावेर-यावल तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
विकासाचे व्हीजन असलेले रावेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे युवा उमेदवार धनंजय चौधरी यांना रावेर-यावल तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे. खिरोदा येथे आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेवून हा पाठिंबा दिला आहे.
विकासाचा ध्यास व सेवेची परंपरा असलेले रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. या निवडणुकीत त्यांना बहुमताने विजयी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असून त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे रावेर-यावल तालुक्यातील धनगर समाजातील नागरिकांनी स्पष्ट केले. आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेत त्यांच्याशी धनगर समाज बांधवांनी चर्चा केली. विकासाच्या मार्गावरून चालणाऱ्या उमेदवार धनंजय चौधरींना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी देविदास बाजीराव बाऊसकर (कर्जोत), डॉ. संजय हरिभाऊ बोरसे(पुनखेडा), सचिन सुकलाल बोरसे(पातोंडी), गजानन बारसू निळे(चिनावल,मल्हार सेना जिल्हाप्रमुख), योगेश भगवान धनके(युवसेना तालुकाप्रमुख, रावेर), प्रकाश काशीराम हडपे(मुंजलवाडी), वासुदेव सुकदेव धनगर(मुंजलवाडी), हरी धनगर(मुंजलवाडी), नितीन वासुदेव धनगर(मुंजलवाडी), विनोद वासुदेव धनगर (मुंजलवाडी), ईश्वर दगडू निळे(उटखेडा), यशवंत गणपत धनके(नेहेता), देवेंद्र संतोष वाघ(खिरवड), राजेंद्र पुंडलीक वाघ(खिरवड), दिलीप बाजीराव बाऊसकर(सांगवी), जगन्नाथ गिरधार धनगर(मुंजलवाडी), भरत गोपाल बाऊसकर(सांगवी), गोपाल चिंधू बाऊसकर(सांगवी बुद्रुक), मयूर बाऊसकर(सांगवी), पांडुरंग सोमा धनगर(मुंजलवाडी), राजू धनगर(कुसुंबा) यांनी पाठिंबा दिला आहे