पूर्व भागात रांगोळ्या काढत महिलांनी दिला धनंजय चौधरींना विजयाचा आशीर्वाद
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांच्या चोरवड अजनाड, मोरगाव बुद्रुक मोरगाव खुर्द, पुनखेडा, पातोंडी, निंभोरासिम, थेरोळा, धुरखेडा, बोहरडे,अजंदा या गावात रांगोळ्या काढत महिलांनी जणू धनंजय चौधरींना विजयाचा आशीर्वाद दिल्याचे चित्र गावागावात दिसून आले.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या चोरवड अजनाड, मोरगाव बुद्रुक मोरगाव खुर्द, पुनखेडा, पातोंडी, निंभोरासिम, थेरोळा, धुरखेडा, बोहरडे,अजंदा या गावात रांगोळ्या काढत महिलांनी जणू धनंजय चौधरींना विजयाचा आशीर्वाद दिल्याचे चित्र गावागावात दिसून आले.
मोरगाव खुर्द येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावातून प्रचारास सुरुवात केली यावेळी शिवसेना उभाठा गटाचे योगराज पाटील यांच्या पत्नी, रावेर तालुका काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या घरी ही महिलांनी रांगोळ्या काढत धनंजय भाऊ यांचे औषण करीत विजयाचा आशीर्वाद दिला
मोरगाव बुद्रुक येथे उमेदवार धनंजय चौधरी यांचे छाया पाटील मीना पाटील यांनी औक्षण करीत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी सरपंच अलका पाटील काँग्रेसचे जुने कार्यकर्ते लक्ष्मण रामू पाटील, शिवदास हिरामण पाटील,रतन सुरसिंग पाटील, जितेंद्र लक्ष्मण पाटील अनिल माधव पाटील भीमराव अर्जुन ढिवरे, किरण ढिवरे, सुमेरसिंग पाटील,रवींद्र नामदेव पाटील, बाळू ढीवरे, सुधाकर पाटील,
यावेळी मोरगाव खुर्द सरपंच जे आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे सोपान पाटील, उभाठाचे योगीराज पाटील, मुजुमदार सर, डॉक्टर पी जी पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष किशोर पाटील, राजू सवरने,कैलास पाटील हिरामण पाटील ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील सदस्य आत्माराम रामचंद्र पाटील साहेबराव चौधरी, गोपाळ रामचंद्र पाटील उपस्थित होते