एन. एस. यु. आय. चा जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधवला कारावास धनादेश अनादर प्रकरणी ४ लाख दंड व ६ महिन्याची शिक्षा
एन. एस. यु. आय. चा जिल्हाध्यक्ष भूपेंद्र जाधवला कारावास ,धनादेश अनादर प्रकरणी ४ लाख दंड व ६ महिन्याची शिक्षा
मुक्ताई न्यूज
नेटवर्क रावेर
बांधकाम ठेकेदार व कॉंग्रेसच्या एन. एस. यु. आय चा जिल्हाध्यक्ष भुपेंद्र श्रीराम जाधव, रा. रसलपूर, ता. रावेर याला धनादेश अनादर प्रकरणी मे. रावेर न्यायालयाने दोषी ठरवत रु. ४ लाख दंड व ६ महिन्याची शिक्षा सुनावली आहे.
धनादेश अनादर प्रकरणी रावेर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार,फिर्यादी विजय पाटील यांचे वक्रांगी केंद्र ए.टी.एम. असतांना तेथे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध होती. आरोपी भूपेंद्र हा फिर्यादीचा मित्र असल्याने फिर्यादीने आरोपीस हात उसनवार रु. ३ लाख दिले. मात्र आरोपीने वेळेवर परतफेड न करता फिर्यादी विजय पाटील यांना हात उसनवार परत फेड साठी दिलेले २ चेक हे न वटता अनादारीत झाले. त्यानुसार फिर्यादीने आरोपीस नोटीस देवूनही हात उसनवार रक्कम न मिळाल्याने रावेर न्यायालयात फौजदारी खटला ८०/२०२१ दाखल केला.
सुमारे ३ वर्ष खटला चालल्यानंतर मे. रावेर न्यायालयाने आरोपीस ६ महिने शिक्षा व रु. ४ लाख ६६६ एवढी रक्कम फिर्यादीस १ महिन्याच्या आत देणे असा आदेश दिला.
फिर्यादी तर्फे अॅड. उदय सोनार तर आरोपी तर्फे अॅड. शीतल जोशी यांनी काम पहिले.