रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची ॲड. रोहिणी खडसे यांच्या कडून पाहणी
रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची ॲड. रोहिणी खडसे यांच्या कडून पाहणी
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
ऐनपूर-काल रात्री पासून सूरू असलेल्या संततधार पाऊसा मुळे तापी आणि पूर्णा नदी ओसंडून वाहत असल्या कारणने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन धरणाचे संपुर्ण दरवाजे उघडण्यात आले असून हजारो लिटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे
ब-हाणूपर शहरालगतच्या इंदूर - अमरावती महामार्गावरील जुन्या पुलावरून पुराचे पाणी जात होते. परिणामत: तालूक्यातील तापी नदी काठच्या नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर गावांचे रस्ते व पुलांवर या धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शिरून परिसराला वेढा पडल्याने या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. तापी नदीच्या महापूरातील बॅकवॉटरखाली नेहता, खिरवड, निंभोरासीम, विटवे, निंबोल व ऐनपूर शिवारातील सुमारे २०० हेक्टर शेतजमीनीतील खरीपाची व बागायती केळी तथा फळबागाबुडाल्याने शेतकऱ्यांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे
ऐनपूर,निंबोल, विटवा व इतर गावात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असुन
प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बॅक वॉटर चे पाणी घरांमध्ये व शेती शिवारात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ऐनपूर येथे भेट देउन महापुराची पाहणी केली
सतंतधार पाऊसाने घरांची पडझड झाली असून पुराचे पाणी घरात घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे
रोहिणी खडसे यांनी ऐनपूर येथे पुराची पाहणी करून नागरिकांना धीर दिला तसेच रावेर तहसीलदार यांच्या सोबत दुरध्वनी वरुन नागरीकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्या बाबत चर्चा केली
यावेळी ॲड.रोहिणी खडसे म्हणाल्या संततधार पाऊसामुळे या परीसरात मोठे नुकसान झाले असून घरांची पडझड झाली असून घरात पाणी शिरल्याने जीवनाश्यक वस्तू भिजल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे तसेच पुराचे पाणी केळी आणि फळबागांच्या शेतीती घुसल्याने शेकडो हेक्टर वरील शेती पाण्याखाली आली आहे
आधीच सी एम व्ही ची नुकसान भरपाई जाहिर करून सुध्दा शेतकरी बांधवांना मिळत नाही आहे तसेच फळपिक विम्याची रक्कम मिळत नसल्याने आधीच सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी महापूरा मुळे अस्मानी संकटात सापडला आहे
शासनाने महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली तसेच नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये तसेच पुर असताना नदी नाले ओलांडू नये असे नागरिकांना आवाहन केले
यावेळी प स सदस्य दिपक पाटील, सरपंच अमोल महाजन, किशोर पाटील, अरविंद महाजन , अक्षय महाजन, मोहन कचरे, सलमान खान, हैदर अली यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक उपस्थीत होते