रावेर तालुक्याती सातपुडा भागात गांजाच्या शेतात पोलिसांचा छापा : परिसरात एकच खळबळ, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रावेर तालुक्याती सातपुडा भागात गांजाच्या शेतात पोलिसांचा छापा : परिसरात एकच खळबळ, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Apr 11, 2024 - 12:33
 0
रावेर तालुक्याती सातपुडा भागात गांजाच्या शेतात पोलिसांचा छापा : परिसरात एकच खळबळ, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुक्ताई वार्ता रावेर

तालुक्यातील रावेर पाल रोडवरील लालमाती सहस्रलींग गावाच्या शेतीशिवारात मोठ्या प्रमाणात एका शेतक-याच्या शिवारात गांजाची शेती असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने रावेर पोलिसांनी कारवाई करत आरोपीस जेरबंद केले.

रावेर पोलिस ठाणे हद्दीतील सहस्रलिंग गावाजवळील ढाब्यासमोरील शेती शिवारात तीन ते चार एकर शेतीत गांजाची शेती केली जात होती. गुप्त माहितीवरून पोलीसांनी धाड टाकत कारवाई करून संशयीतास ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी सुमारे पाच ते सहा फुट उंचीचे गांजाचे झाडे असल्याची माहिति मिळत आहे. या शेतात उघडपणे गांजाची शेती केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पोलिस निरीक्षक डाॅ . विशाल जैस्वाल, उपविभागीय अधिकारी अन्नपुर्णासिंग, यांच्यासह पोलिस कर्मचारी पंचनामा करीत होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील