राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर

Apr 10, 2024 - 14:46
 0
राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभेची उमेदवारी जाहीर

मुक्ताई वार्ता न्यूज

नेटवर्क रावेर 

रावेर लोकसभा मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याचा गेल्या अनेक दिवसापासून घोळ सुरू होता अखेर शरद पवार गटातील रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांना ती संधी मिळाली असून त्याचं नक्कीच सोनं होणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे

  सुरुवातीला आमदार एकनाथराव खडसे यांनी येथून लढण्याची घोषणा केली होती. नंतर, मात्र त्यांनी वैद्यकीय कारणास्तव आपण लढण्यास असमर्थ असल्याचे घोषीत केले. यानंतर यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील, रावेरचे माजी आमदार अरूण पाटील आदींची नावे समोर आली. यानंतरच्या टप्प्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, उद्योजक विनोद तराळ आणि कंत्राटदार विनोद सोनवणे यांची नावे समोर आली. मध्यंतरी भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे देखील पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती.

यानंतर अलीकडेच रावेर येथील उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांचे नाव समोर आले. त्यांनी मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. यानंतर सोमवारी पक्षाच्या पुणे येथील बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर अतिशय विस्तृत अशी चर्चा झाली. यात शेवटच्या टप्प्यात फक्त रवींद्रभैय्या पाटील आणि श्रीराम पाटील ही दोन नावे उरली. तर दोन्ही उमेदवारांशी शरद पवार व जयंत पाटील यांनी स्वत: चर्चा केली. यानंतर रात्री उशीरा श्रीराम पाटील यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला तेव्हाच त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

 आज पक्षाने ट्विटरवरून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात रावेर लोकसभा मतदारसंघातून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी प्रदान केल्याचे जाहीर केले आहे. या माध्यमातून रावेरमध्ये आता भाजपच्या रक्षा निखील खडसे यांचा मुकाबला हा शरद पवार गटाच्या श्रीराम दयाराम पाटील यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील