बोरखेडा येथील पोलीस पाटील अरुण पाटील यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील पोलीस पाटील अरुण शांताराम पाटील यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली यामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील पोलीस पाटील अरुण शांताराम पाटील वय 41 यांचे अपघाती दुर्दैवी निधन झाल्याने त्यांच्या परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे
बोरखेडा येथील पोलीस पाटील अरुण शांताराम पाटील व त्यांची पत्नी सविता अरुण पाटील हे दोघे शिरपूर मध्यप्रदेश येथून घरी परतताना शिरपूर बाहेरील पेट्रोल पंपाजवळ रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या रॉड तुटल्याने ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघात अरुण पाटील यांच्या शरीराच्या खालील भागावरून ट्रॅक्टर ट्रॉलीी चाक गेल्याने त्यांचा अतिरक्तस्राव झाला त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात बऱ्याच वेळाने पोहोचवल्या गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सविता अरुण पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अरुण शांताराम पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या परिवारात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार रोजी 11 वाजता बोरखेडा येथून राहत्या घरून निघणार आहे शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला दुःख सावरण्याचे शक्ती देवो हीच मुक्ताई वार्ता परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी, दोन मुली, भाऊ, वहिनी पुतणे असा परिवार आहे. ते शांताराम नारायण पाटील यांचे मोठे मुलगा तर नितीन शांताराम पाटील यांचे मोठे बंधू होते.