रावेरातील होंडा शोरूम मध्ये चोरी,रावेर पोलिसात गुन्हा दाखल
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेरातील होंडा शोरूम मध्ये चोरी,रावेर पोलिसात गुन्हा दाखल तपास सुरू
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर येथील सावदा रोडवरील राम होंडा शोरूमच्या मागील बाजूची खिडकी शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. शोरूममधील कॅश काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 25,000 रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा रोडवरील होंडा शोरूम मध्ये शनिवारी मध्यरात्री शोरूमच्या मागील बाजूस असलेली काचेचे स्लायडिंगची खिडकी तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला.
होंडा शोरूमच्या कॅश काउंटर दोन्ही ड्रॉवरमधील कागदपत्र ही इतरत्र फेकून दिले आहे तर ड्रॉवरमध्ये ठेवलेले 25,000 रुपये चोरून नेले आहेत. रावेर येथील होंडा शोरूमचे संचालक अमोल महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत