केळी पिक विमा मिळावा यासाठी तीन ऑक्टोबरला रास्ता रोको आंदोलन करणार शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय, नायब तहसीलदार यांना दिले निवेदन

केळी पिक विमा मिळावा यासाठी तीन ऑक्टोबरला रास्ता रोको आंदोलन करणार शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय, नायब तहसीलदार यांना दिले निवेदन

Sep 26, 2023 - 21:52
 0

मुक्ताई न्यूज

नेटवर्क रावेर

रावेर यावल मुक्ताईनगर सह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ मिळावे व cmv रोगाने केळी पीक उध्वस्त झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने शेतकऱ्यांची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपन्न झाली. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून घोषणा देत तहसील पर्यंत जाऊन शेतकऱ्यांना पिक विमा चे पैसे तात्काळ मिळावे व इतर मागण्यासह निवेदन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना देत येणाऱ्या 3 ऑक्टोबर रोजी आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे सांगितले, आणि त्यानंतरही विम्याचे पैसे मिळाले नाही तर पुढील काळात आमरण उपोषणाचा ही इशारा यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला

 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉक्टर राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक गणेश महाजन,माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, पी आर पाटील, शैलेंद्र पाटील, विनोद पाटील, मेहमुद शेख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील