वडगाव वाघोदा दरम्यान साई सिद्धी ट्रॅव्हल्स ला भीषण आग सुदैवाने कोणालाही दुखापत नाही
रावेर सावदा रोडवरील वाघोदा वडगाव दरम्यान साई सिद्धी ट्रॅव्हलला भीषण आग सुदैवाने कोणालाही दुखापत नाही सर्व प्रवासी सुखरूप
रावेर ते पुणे मोठ्या संख्येने खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांची वाहतूक करत असतात आज संध्याकाळी रावेर मधून पुण्याकडे निघालेली साई सिद्धी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन जात असताना वडगाव वाघोदा दरम्यान अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली लागलीच प्रवाशांना खाली उतरवल्याने पुढील अनर्थ टळला
रावेर नगरपालिकेतर्फे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन आग विझवण्यात यशस्वी ठरले असून पुढील अनर्थ टळला आहे बस मात्र पूर्ण जळून खाक झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे आप आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केल्याचे सध्या चित्रात इथं दिसून आले
ट्रॅव्हलच्या अशा घटनांमध्ये मोठी वाढ होत चालली आहे परंतु आरटीओ विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे बऱ्याच जुन्या गाड्यांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केला जात असल्याने अशा घटना घडत असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे