सर्वांचे आराध्य दैवत श्री पाराचा गणपतीला श्री अंबिका व्यायाम शाळा तर्फे मानाचा हार वाजत गाजत अर्पण

सर्वांचे आराध्य दैवत श्री पाराचा गणपतीला श्री अंबिका व्यायाम शाळा तर्फे मानाचा हार वाजत गाजत अर्पण

Sep 26, 2023 - 18:19
 0

मुक्ताई  न्यूज

नेटवर्क रावेर

श्री अंबिका व्यायाम शाळा रावेर तर्फे सुरुवातीला उद्योजक श्रीराम पाटील यांचा सत्कार व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांच्या हस्ते करण्यात आला व नंतर मानाचा पुष्पहार डोक्यावर घेऊन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, उद्योजक श्रीराम पाटील यांच्यासह सर्वांनी वाजत गाजत मानाचा हार पाराच्या गणपती मंदिरात आणून पाराच्या गणपतीला पूजा अर्चा करून चढविण्यात आला व आरती करण्यात आली. गणपती बाप्पा की जय, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया ने सर्व परिसर भक्तीमय झाला.

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष श्री पद्माकर भाऊ महाजन. शहर अध्यक्ष दिलीप पाटील.उपाध्यक्ष अरुण शिंदे. चिटणीस उमेश महाजन. मा. अध्यक्ष मनोज श्रावक. भूषण महाजन. कृषी केंद्राचे संचालक भगवान महाजन नितीन पाटील. यशोधन कृषी केंद्र संचालक युवराज महाजन. अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री भास्कर दादा महाजन. उपाध्यक्ष रवींद्र महाजन. अनिल पाटील. विकास मराठे. भूषण महाजन. विश्वनाथ भोई. चंदू रायपूरकर. गणेश महाजन. विकास देशमुख. आर आर महाजन. अनिल टेलर. योगेश प्रजापती सखाराम असलकर. बाळा आमोदकर. पवन चौधरी. नथू महाजन. दिवाकर प्रजापती. संतोष पाटील. मोठ्या संख्येने महिला व बालगोपाल उपस्थित होते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील