जालना जिल्ह्यातील घटनेचा रावेर तालुक्यातील नागरिकांकडून विवरा येथे रास्ता रोको आंदोलन करित निषेध

जालना जिल्ह्यातील घटनेचा रावेर तालुक्यातील नागरिकांकडून विवरा येथे रास्ता रोको आंदोलन करित शब्दात निषेध करण्यात आला

Sep 10, 2023 - 01:20
 0
जालना जिल्ह्यातील घटनेचा रावेर तालुक्यातील नागरिकांकडून विवरा येथे रास्ता रोको आंदोलन करित निषेध

मुक्ताई वार्ता

न्यूज नेटवर्क रावेर

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवित विवरा, तालुका रावेर येथील अंकलेश्र्वर बऱ्हाणपूर महामार्गावर विवरा परिसरातील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनामुळे एक ते दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. 

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारचा तीव्र शब्दात निषेध व आंदोलकांना पाठिंबा दर्शवित विवरा व परिसरातील मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी नऊ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. विवरा येथील सर्वच समाजातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. दीड तास आंदोलन सूरु होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दीड दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

 या आंदोलनात यादवराव पाटील, धंनजय चौधरी, पंकज बाबुराव पाटील, गोपाळ दत्तात्रय पाटील, संदीप पाटील, योगेश पाटील,अमोल पाटील सुनील पाटील, किशोर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी निंभोरा पोलिसांच्या वतीने चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील