समाजाच्या विकासात तरूणांची भूमिका महत्त्वाची प्रा.डॉ.गणपतराव ढेंबरे
रावेर -येथील श्री.व्ही.एस.नाईक कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या उदबोधन वर्गात प्राध्यापक डॉ.गणपतराव ढेंबरे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की , समाजाच्या विकासात तरूणांची भूमिका महत्त्वाची असते.
रावेर -येथील श्री.व्ही.एस.नाईक कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या उदबोधन वर्गात प्राध्यापक डॉ.गणपतराव ढेंबरे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की , समाजाच्या विकासात तरूणांची भूमिका महत्त्वाची असते. समाजातील तरूणांनी उद्योमशील बनले पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रांत तरुणांनी कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कष्ट करून संपत्ती तरुणांनी उभी करावी. असे आवाहन डॉ.ढेंबरे यांनी केले. सदर उदबोधन वर्गाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.बी.गव्हड ,रा.से.यो.सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.पी.गाढे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातील प्रा.गव्हाड यांनी प्रास्तविक केले. त्यांनी या उदबोधन वर्गाच्या आयोजनची गरज काय आहे. याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.सी.पी.गाढे यांनी केले. तर आभारप्रदर्शन रा.सो.यो.स्वयंसेवक तनिष बोदडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य पी.व्ही.दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी कष्ट घेतले