मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली फाट्या जवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई
मुक्ताईनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या राजधाब्याच्या पाठीमागे केळीच्या बागेत जुगार अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली होती याच गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली आहे
मुक्ताईनगर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक असलेल्या राजधाब्याच्या पाठीमागे केळीच्या बागेत जुगार अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली होती याच गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली आहे या धाडीमध्ये, आठ जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते , यांनी केली आहे यावेळी अशोक जाधव, रवींद्र चौधरी, लतीफ तडवी, देवसिंग तायडे, मंगल साळुंखे, चेतन गवते, विशाल सपकाळे, या पोलीस पथकाने कारवाई केली, या कारवाईमध्ये सुमारे 23 हजार 330 रुपयाची रोख रक्कम सापडली असून आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,अधिक तपास मुक्ताईनगर पोलीस करत आहेत