कठोर परिश्रमाशिवाय यश संपादन होत नाही -प्रा प्रकाश मुजुमदार
कठोर परिश्रमाशिवाय यश संपादन होत नाही -प्रा प्रकाश मुजुमदार
मुक्ताई वार्ता न्यूज
नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यातील विवरे येथील श्री ग गो बेंडाळे हायस्कूल विवरे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न झाला
जीवनात अनेक चढ उतार येतात परंतु यश संपादन करण्याकरता कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा प्रकाश मुजुमदार यांनी सांगितले या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव धनंजय शिरीष चौधरी ,दारा मोहम्मद माजी नगराध्यक्ष रावेर हे उपस्थित होते कार्यक्रमचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.शैलेश राणे यांनी केले शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिके प्रदान करण्यात आली तसेच यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये पूर्व विभाग भुसावल माध्यमिक पतपेढीचे सचिव प्रा व्ही व्ही पाटील , शाळेचे मुख्याध्यापक श्री पी एच वायकोळे यांना जिल्हास्तरावरील आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला ,श्री ए जे सोळुंके कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल ,
प्रतीक वारके आदर्श शेतकरी यांना विविध पुरस्कार मिळाले त्यानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता दहावीतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी कुणाल संतोष पाटील व विद्यार्थिनी भाग्यश्री विशाल पाटील यांचा सत्कार ही करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी प्रा डी एस चौधरी, रवींद्र गायकवाड, योगेश खरात,अशरफ तडवी ,संस्थेचे अध्यक्ष मार्तंड भिरूड, चेअरमन धनजी लढे, व्हाईस चेअरमन रामचंद्रराव देशमुख, दिलीप राणे, केशव राणे, कार्यकारणी सदस्य, विद्यार्थी- विद्यार्थिनी , पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तेजल भिरूड व आभार सुनिता सुरवाडे मॅडम यांनी मानले