*अकोला शहरात आर्टिफिशियल लसूण दाखल, ग्राहकांची होतेय फसवणूक
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला लसुन सध्या भाव खात असून लसूण विकत घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर झाले आहे.
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला लसुन सध्या भाव खात असून लसूण विकत घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर झाले आहे.
यातच काही लसणाचा काळाबाजार करणाऱ्यांनी अजब शक्कल लढवीत नागरिकांची फसवणूक करण्याचे काम सुरू केले आहे, अकोला शहरातील
फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी शहरासह कॉलनी भागात येत असतात यातीलच काही फेरीवाल्यांकडे डुप्लिकेट लसुन विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
अकोला शहरातील बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याची प्रकार उघडकीस आला आहे. सुधाकर पाटील यांच्या पत्नी यांनी त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून एक पाव लसूण विकत घेतले, आज भाजी करण्यासाठी लसूण घेतला असता यामधील एक लसणाची गाठ ही हुबेहूब ओरिजनल लसनासारखी आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवली असल्याचे दिसून आले.
लसण सोलताना त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता ही गाठ सिमेंट पासून लसणासारखी बनवली असून यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे, अकोला शहरांमध्ये सध्या लसणाचे भाव हे तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले असून काही लसणाची काळाबाजारी करणाऱ्या टोळ्या बाजारपेठेत सक्रिय झाल्या असून या टोळ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करीत असल्याची माहिती मिळत आहे. अकोला शहरातील किरकोळ भाजीविक्रेते यांच्याकडून लसुन घेताना नागरिकांनी काळजीपूर्वक विकत घ्यावी असे आवाहन सुधाकर पाटील यांनी केले आहे.