शेतमजूर महिलेचा अंगावर वीज पडल्याने दुर्दैवी मृत्यू, परिवारावर दुःखाचा डोंगर
रावेर ( मुक्ताई न्यूज नेटवर्क ): रावेर तालक्यातील शिंगाडी येथे काल दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतमजूर महिलेवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरातून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
रावेर (मुक्ताई न्यूज नेटवर्क ):
रावेर तालक्यातील शिंगाडी येथे काल दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतमजूर महिलेवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरातून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत जब्बार शाह लाल शाह फकीर (रा फेकरी ता. भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर महिला ही आपल्या गावातील गावातील महिलांसोबत नेहमीप्रमाणे शेतमजुरीसाठी शेतात कामावर गेल्या होत्या. दुपारी काम कामावरून घरी परत येताना गावातील शिंगाडी शिवारात शैलेंद्र सोपान पाटील यांनी केलेले शेत गट नंबर १५१ या शेतात मलेखा बी शहा यांच्या आंगवर वीज पडून त्या जागीच पडल्या असता त्यांना ऐनपुर येथे खासगी दवाखान्यात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुदैवाने त्यांच्या सोबत असलेल्या इतर महिला त्यांच्यात चालत असतांना अंतर आल्यामुळे इतर महिला बचावल्या अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात रावेर येथे करण्यात आले. तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे सा पो निरिक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिजवान पिंजारी करीत आहे.