अवैध जळावू लाकूड वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई ट्रकसह मुद्देमाल जप्त
अवैध जळावू लाकूड वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई ट्रकसह मुद्देमाल जप्त
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क रावेर
अवैध लाकडाची वाहतूक करत असलेल्या संशयावरून वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबवून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना चौकशी केली असता त्यातून अवैध लाकडाची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ट्रक चालक शेख अन्वर शेख कडू खानापूर तालुका रावेर याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक सह जळावू लाकूड जप्त करण्यात आला आहे.
रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, फैजपूरचे वन आगार रक्षक सतीश वाघमारे व चालक विनोद पाटील हे फैजपूर यावल रस्त्यावर नियमित गस्त घालत असताना फैजपूर येथील खाजगी महाविद्यालयाजवळ संशयास्पद जळावू लाकूड भरलेला एक ट्रक मिळून आला. ट्रकला थांबवून चौकशी केली असता त्यात विना परवाना जळावू लाकूड असल्याचे निदर्शनास आले. वन अधिकाऱ्यांनी हा ट्रक ताब्यात घेतला असून चालक शेख अन्वर शेख कडू याच्या विरूद्ध भारतीय वन अधिनियम व महाराष्ट्र वन नियमावली अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६,६०० रुपयांचे १९ घन मीटर पांचारास जळाव वू लाकूड व ३,३०,००० रूपये किमतीचा ट्रक क्रमांक एम
पी ०९ केसी ५५५९ असा एकूण ३,५६,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाई रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी उपवनसंरक्षक यावल जमीर शेख व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
रावेर शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जळावू लाकडाचा साठा केलेला असल्याचे निदर्शनास आल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे