रावेर तालुक्यातील मोरव्हाल येथे मोटर सायकल व बस अपघातात एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

रावेर तालुक्यातील मोरव्हाल येथे मोटर सायकल व बस अपघातात एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

Oct 4, 2023 - 23:14
 0
रावेर तालुक्यातील मोरव्हाल येथे मोटर सायकल व  बस अपघातात एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

मुक्ताई वार्ता रावेर

न्यूज नेटवर्क रावेर

मोटर सायकल ने एस.टी. बसला मागून जोरदार धडक दिल्यामुळे एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मोरव्हाल येथे घडली.

याबाबत रावेर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील बोरवाल ता. झिरण्या जिल्हा खरगोन येथील विठ्ठल रामसिंग भिलाला व बबलू आणसिंग भिलाला हे दोघे मोटर सायकल क्रमांक एम.पी. 10 एम.सी. 0130 ने खरगोन कडून रावेरकडे येत असतांना पालकडून रावेर कडे येणा-या बस क्रमांक एम.एच. 20 बी. एल. 0910 या बसला मोरव्हाल फाट्या जवळ मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात विठ्ठल भिलाला (  वय 50) हे ठार झाले तर बबलू आणसिंग भिलाला (वय30) हा जखमी झाला आहे. सुनिल भिलाला याने रावेर पोलिसात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील