सावदा पिपंरुड रस्त्यावर भीषण अपघातातील छायाचित्रकर गणेश भोई यांचेही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l सावदा पिपंरुड रस्त्यावर भीषण अपघातातील छायाचित्रकर गणेश भोई यांचेही उपचारादरम्यान दुर्दैवी मुर्त्यू झाल्याची घटना घडली.
मुक्ताई न्यूज नेटवर्क raver l
सावदा – भुसावळ रस्त्यावरील सावदा – पिंपरुड रस्त्यावर होंडा सिटी कारने झाडाला ठोस दिल्याने मोठा अपघात झाला होता या भीषण अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले होते तर तिघांवर उपचार सुरु होते तयापैकी आज छायाचित्रकार गणेश भोई अंदाजे वय 28 यांचाही जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली
दोन दिवसापूर्वी रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास भुसावळ कडून येणाऱ्या MH 20 CH 8002 या क्रमांकाच्या होंडा सिटी गाडीने सावदा – भुसावळ रस्त्यावरील पिंपरुड सावदा दरम्यानच्या रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने त्यात कारचा चक्काचूर झाला, शुभम सोनार, मुकेश रायपुरकर,जयेश भोई हे तीन जण ठार झाले होते.
तर विजय जाधव,गणेश भोई अक्षय उन्हाळे यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते आज गणेश भोई छायाचित्रकार यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश भोई यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच मुक्ताई वार्ता परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ????????