तळोदा बऱ्हाणपूर महामार्गाची कोणती अधिसूचना नाही फैजपुर उपविभागीय अधिकारी यांची माहिती
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l तळोदा बऱ्हाणपूर महामार्गाची कोणतीही अधिसूचना नाही अशी माहिती फैजपुर उपविभागीय अधिकारी यांनी दिली आहे

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l
भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753 BE तळोदा ते ब-हाणपूर चौपदरीकरणा बाबत राजपत्र कलम 3 (A) ची अधिसूचना सोशल मिडिया व व्हॉटसअॅप ग्रुप वर प्रसिध्द होत आहे. सदर सोशल मिडिया व व्हॉटसअॅप ग्रुप वर प्रसिध्द झालेल्या अधिसूचनेबाबत रावेर व यावल तालुक्यातील शेतकरी / जमीनधारक फैजपूर प्रांत कार्यालयात चौकशी कामी येत आहे.
तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753 BE तळोदा ते ब-हाणपूर चौपदरीकरणा बाबत राजपत्र कलम 3 (A) ची अधिसूचना इकडील कार्यालयाकडून अद्यापपावेतो प्रसिध्द करण्यात आलेली नाही अशी माहिती(निवृत्ती गायकवाड) प्र. उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांनी दिली आहे