रावेरात आमदार शिरीष चौधरींच्या उपस्थितीत श्रीराम पाटीलांचा प्रचार शुभारंभ ,मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे मतदारांचे आश्वासन
रावेरात आमदार शिरीष चौधरींच्या उपस्थितीत श्रीराम पाटीलांचा प्रचार शुभारंभ ,मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे मतदारांचे आश्वासन
प्रतिनिधी / रावेर
महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा रविवारी रावेर शहरात आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. रावेरवासियांचे ग्रामदैवत असलेल्या पाराच्या गणपती मंदिरात प्रचार नारळ वाढविण्यात आला.
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा शिवसेना (उबाठा गट) उपप्रमुख प्रल्हाद महाजन, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष शितल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणपतीची पूजा करून आरती करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, विनायक महाजन, एस आर चौधरी, अशोक शिंदे, सुरेश चिंधू पाटील, अब्दुल मुतालिब, संजय वाणी, सोपान बाबुराव पाटील, सादिक मेंबर, आयुब मेंबर, यशवंत धनके, ऍड टी डी पाटील, ऍड आर आर पाटील, योगेश बारी, ज्ञानेश्वर महाजन, प्रा डी एस चौधरी, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील,सउद शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी रावेर शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मतदारांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.तसेच मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे मतदारांनी यावेळी आश्वासन दिले .