शरदचंद्रजी पवार यांची श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ ३ मे रोजी चोपडा व मुक्ताईनगर येथे सभा तर भुसावळ येथे बैठक
शरदचंद्रजी पवार यांची श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ ३ मे रोजी चोपडा व मुक्ताईनगर येथे सभा तर भुसावळ येथे बैठक
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
रावेर/प्रतिनिधी
माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या ३ मे रोजी जळगांव जिल्हयात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर येथे शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर भुसावळ येथे पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा येथे सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये महाविकास आघडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. तर संध्याकाळी सात वाजता मुक्ताईनगर येथील कोथळी रोडवरील मुक्ताई क्रीडा संकुल येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने चोपडा, भुसावळ व मुक्ताईनगर येथे उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.