सिंगत येथे बिबट्या कडून 6 बकऱ्यांची शिकार, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
सिंगत येथे बिबट्या कडून 6 बकऱ्यांची शिकार, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर तालुक्यातील सांगत येथे बिबट्याने रात्री येऊन वाड्यातील सहा बकऱ्यांची शिकार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सिंगत ता. रावेर जि. जळगाव येथील मुकेश विश्वनाथ पाटील यांच्या गावा जवळ असलेल्या वाड्यात असलेल्या सहा शेळ्या वर बिबट्या ने रात्री च्या वेळी येऊन दोन शेळ्या ना नरडि फोडून मारल्या तर बाकी च्या शेळ्याना ओढून वाड्याजवळ असलेल्या वनीकरण मध्ये घेऊन गेल्याचे आढळून आले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून या पोटी भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे तर बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
वनविभागचे अधिकारी येऊन त्यांनी पंचनामा करून पुढील तपास करणार असल्याचे सांगितले. तसेच निंभोरा पो. स्टे. चे अढागळे यांनी भेट देत पाहणी केली. गावातील सर्व नागरिक यांना रात्री सतर्क राहण्याचे आवाहन वन विभाग व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे