कुसुंबा येथे तरुणीची आत्महत्या, तर बक्षीपुर येथील 42 वर्षे युवकाचा विहिरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू
कुसुंबा येथे तरुणीची आत्महत्या, तर बक्षीपुर येथील 42 वर्षे युवकाचा विहिरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू
मुक्ताई न्यूज नेटवर्क
| रावेर
रावेर तालुक्यातील कुसुंबा आणि बक्षीपुर गावात दुर्दैवी घटना घडल्या आहेत. कुसुंबा येथील १८ वर्षीय युवतीने आत्महत्या केली असून बक्षीपुर येथील ४२ वर्षीय युवकाचा विहीरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
रावेर तालुक्यातील कुसुंबा येथे आई-वडील फैजपुर येथे महाविद्यालयात मुलाचे ऍडमिशन करायला गेले असताना घरात कोणीही नसल्याने तबस्सूम तडवी अंदाजे वय 18 हिने एंगलला साळीच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला तिच्या काकूने पाणी आलाय सांगायला आवाज दिला पण ती आली नाही मग काकू घरात गेली असता ही दुर्दैवी घटना समोर आली.
रावेर जवळील बक्षीपुर येथील जगदीश ज्ञानेश्वर महाजन वय42 हे शेतात काम करत असताना व्हेरी जवळ गेले असता पाय घसरून विहीरीत पडले. त्याचे चुलत भाऊ प्रविण महाजन यांनी फोन केला असता त्यांना बराच वेळ होऊनही प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता जगदीश महाजन हे विहीरीत पडलेले आढळले. त्यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. जगदीश महाजन यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, आई आणि वडील असा परिवार आहे. या दोन्ही घटनांची रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत