यावल तालुक्यातील अतिदुर्गम आदीवासी भागात जात प्रमाणपत्र व अधिवास दाखले वाटप
यावल तालुक्यातील अतिदुर्गम आदीवासी भागात जात प्रमाणपत्र व अधिवास दाखले वाटप

मुक्ताई न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील अतिदुर्गम आदीवासी भागातील गाडऱ्या, जामण्या, उसमळी, लंगडाआंबा येथे आदीवासी बांधवांना जात प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र यांचे वाटप प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की यावल तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात दि . 8 रोजी आदीवासी भागात जाऊन शासनाच्या वतीने आदिवासी बांधवांना गाड-या,जामण्या, उसमळी, लंगडाआंबा या चार आदीवासी गावानंमध्ये फैजपूरचे नवनियुक्त उपविभागीय प्रांत अधिकारी बबनराव काकडे व यावल तहसीलदार मोहनमाला माझीरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आदिवासी भागातील नागरिकांना दाखले जागेवर उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या चेहर्यावर आनंद निर्माण झाला होता त्याच प्रकारे आदिवासी भागात दाखले वाटप करण्यात येणार असल्याचे तहसीलदार मोहनमाला माझीरकर व प्रांताधिकारी यांनी सांगितले यावेळी फैजपूरचे नवनियुक्त उपविभागीय प्रांत अधिकारी बबनराव काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला माझीरकर, नायब तहसीलदार संतोष विनंते,निवडणूक अधिकारी रशिद तडवी, व आदीवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.