रावेर तेेली समाज तर्फे संंत संंताजी जगनाडे महाराज पुुण्यतिथी विविध कार्यक्रंमानी साजरी

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तेेली समाज तर्फे संंत संंताजी जगनाडे महाराज पुुण्यतिथी विविध कार्यक्रंमानी साजरी

Jan 2, 2025 - 20:20
 0

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर 

       

तेली समाजाचे अराध्य दैवत संत शिरोमणी प.पु.संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रावेर तेली समाजा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न झाले. या वेळी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी महाराजांच्या मुर्तीची पालखीतुन टाळमृदुंगाच्या, विठु नामाच्या गजरात भव्य मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. तर मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण संताजी जगनाडे महाराज यांचा त्रिगुणात्मक तेल घाना प्रतिकात्मक देखावा व संताजी जगनाडे महाराजांची मोठी मुर्ती होती.

      येथील तेली समाज नियोजीत मंगल कार्यालय जागा, राजे छत्रपती शिवाजी चौक, श्रीकृष्ण गौशाळे जवळुन संताजी महाराज यांच्या मुर्तीची सजविलेल्या पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते पुजन करण्यात आले.  

   मिरवणुकीच्या अग्रभागी विवरे येथील महिला भजनी मंडळ होते. शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई वाडा, महात्मा गांधी चौक, डाॅ हेडगेवार (चौराहा) चौक, मेन रोड, महाराजा अग्रसेन महाराज चौक, पाराचा गणपती, विखे चौक, राजे छत्रपति शिवाजी महाराज चौक, तेली समाज नियोजीत मंगल कार्यालय जागा येथे सांगता झाली. या नंतर आयोजित कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच क्रिडा व अन्य क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर दत्तु चौधरी जळगाव, अशोक चौधरी भुसावल, राजेंद्र चौधरी वरणगाव, गोपाल चौधरी किनगाव, यांचेसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या चरित्र माहितीचा विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्र संचालन चंद्रकांत चौधरी यांनी केले.

  या कार्यक्रमा नंतर तिर्थप्रसाद व भंडारा कार्यक्रम संपन्न झाला.

     या वेळी अध्यक्ष सुभाष चौधरी, उपाध्यक्ष हिरामण चौधरी, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, सचिव संजय चौधरी, सहसचिव चंद्रकांत चौधरी, खजिनदार ज्ञानेश्वर चौधरी, संजय चौधरी, भुषण महाजन, सुनील चौधरी, राजेंद्र चौधरी, अंबादास चौधरी, शांताराम चौधरी, दिनेश चौधरी, संतोष चौधरी, भगवान चौधरी, लिलाचंद चौधरी, भागवत चौधरी, विलास चौधरी, नारायण चौधरी, अशोक चौधरी, विनोद चौधरी, पंकज चौधरी, किरण चौधरी, गणेश चौधरी, बंटी चौधरी, अमोल कासार, यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते. 

    रावेर तेली समाज पंच मंडळातील सदस्य, समस्त तेेली समाज बांधव, महिला मंडळ, युवक वर्ग या सह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येनेे कार्यक्रमास उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील