श्रीकृष्ण गौशाळेला आमदार अमोल जावळे यांची सदिच्छा भेट
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l श्रीकृष्ण गौशाळेला आमदार अमोल जावळे यांची सदिच्छा भेट, मदत करण्याचे यावेळी दिले आश्वासन
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
रावेर येथील श्रीकृष्ण गोशाळा रावेर येथे आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट लाडके आमदार अमोल जावळे यांनी संध्याकाळी येऊन गोशाळेत गोपूजन व आरती केली .
सदर प्रसंगी त्यांच्या समवेत बुऱ्हानपूरच्या आमदार अर्चना चिटणीस दीदी यांचे बंधू अमित मिश्राजी बऱ्हाणपूर यांचे सह रावेर चे माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ संदीप पाटील, रवींद्र पवार,भाजपाचे सी एस पाटील उमेश महाजन मनोज श्रावक, भुषण महाजन, माजी उपनगराध्यक्ष सुधाकर महाजन, सी.एस.पाटील नितीन पाटील,जेष्ठ पत्रकार दीपक नगरे , दिलीप वैद्य, रवींद्र महाजन, मधुकर शिंदे, सुधाकर शिंदे, रविंद्र पाटील, राजेश शिंदे,सुरेश शिंदे, बाळा आमोदकर यांचेसह भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ व सर्व पदाधिकारी, तसेच श्रीकृष्ण गोशाळेचे कार्याध्यक्ष सुनील शेठ अग्रवाल, अध्यक्ष विशाल अग्रवाल, उपाध्यक्ष भुषण कासार उपाध्यक्ष अमोल पाटील सचिव चंद्रकांत चौधरी श्री कपील महाराज,भास्कर बारी संतोष चौधरी मनोज श्रावक भूषण अग्रवाल दिनकर महाजन कुणाल ओतारी, अक्षय महाजन आकाश चौधरी यांचे सह सर्व गोशाळा समितीचे सदस्य व परीसरातील सर्व भाविक गोभक्त उपस्थित होते.
श्रीकृष्ण गौशाळा समिती चे सचिव चंद्रकांत चौधरी यांनी प्रास्ताविक केले व अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी गोशाळा विषयी माहिती दिली व आमदार श्री अमोल भाऊ जावळे यांनी गोमाता व गोसेवा बद्दल माहितीपर मनोगत व्यक्त केले व शासकीय मदतीची उपस्थितांना ग्वाही दिली.आभार प्रदर्शन श्री संतोष चौधरी यांनी केले