गुरुमंत्रावर साधकांची अतूट निष्ठा असणे गरजेचे :- संत गोपाल चैतन्य जी महाराज

गुरुमंत्रावर साधकांची अतूट निष्ठा असणे गरजेचे :- संत गोपाल चैतन्य जी महाराज

Jul 21, 2024 - 23:12
 0
गुरुमंत्रावर साधकांची अतूट निष्ठा असणे गरजेचे :-  संत गोपाल चैतन्य जी महाराज
गुरुमंत्रावर साधकांची अतूट निष्ठा असणे गरजेचे :-  संत गोपाल चैतन्य जी महाराज

गुरुमंत्रावर साधकांची अतूट निष्ठा असणे गरजेचे :- संत गोपाल चैतन्य जी महाराज

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर 

 पाल ता रावेर:- गुरूदेवा प्रति श्रद्धा व त्यानी दिलेल्या गुरु मंत्रावर साधकांची अतूट निष्ठा असणे अति आवश्यक असे श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे विद्यमान पदस्थ व परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजी यांचे कृपापात्र शिष्य श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सत्संग अमृत वाणीतुन गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वृन्दावम धाम पाल आश्रमात आलेल्या भाविक भक्तांना संदेश दिला.याच प्रसंगा वर उदाहरण देत श्रदेय बाबाजी यांनी एक संत त्यांनी गुरु मंत्र भक्तांना दिला परंतु त्यामध्ये एक अनोळखी भक्त एके दिवशी त्या गुरुजी कड़े दर्शना साठी आल्यावर त्यांनी गुरुजीना सांगितले की मी तुमचा शिष्य असून मला आपण जे गुरुमंत्र दिले होते त्याचे मि निरंतर जाप कारित आहोत.त्यावर गुरुजी विचाराधीन झाले आणि तुला मी गुरुमंत्र कधी दिले ते मला आठवत नसून तूला कुठला गुरुमंत्र दिला होता ते सांग.तोवर भक्त म्हणाला की गुरुमंत्र आपण सर्व भक्तानां देत होते तेव्हा मि तुमच्या दर्शनाला आलो होतो तेव्हा आपण मला 'ए हट' असे सांगितले होते .तेच मि गुरुमंत्र समजून त्याचे निरंतर जाप कारित आहोत.तेव्हा गुरुजिनि सांगितले की मि तुला गुरुमंत्र दिला नव्हता तर त्यावेळेस तुला 'ए हट' म्हणजे बाजूला हो असे सांगितले होते आणि तू त्याला गुरुमंत्र समजून जाप करत आहे.गुरुमंत्र कसे ही असो परंतु तुझि गुरु प्रत्ति अटूट निष्ठा व गुरु मुखातून निघालेल्या शब्दाला मंत्र संबोधित करून जाप करित आहे.त्यावर खरच तू माझा निष्ठावान शिष्य आहे असेच गुरुवर भाव असणे त्यातूनच साधकांच्या जीवनाचा उद्धार होतो असे गुरुजिनि सांगितले.

    दी :- २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सातपुडयातील पाल येथील संदगुरु परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम येथे देशभरातून किमान पन्नास हजार चैतन्य साधक भक्त परिवाराचे गुरु दर्शनाकरिता आगमन झाले. दी:-२० जुलै रोजी दुपारी मध्यप्रदेशहुन व कन्नड़,सोयगाव,जामनेर हुन दोनशे किलोमीटर चा पायी दिंडीचा प्रवास करीत हजारो चैतन्य साधक भक्त परिवार पाल वृंदावन धाम आश्रमात दाखल झाले .त्यांच्या स्वागता करिता आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज सह ब्रम्हचारी यांनी किमान दहा किलोमीटर चा पायी प्रवास करीत आले.तसेच 

 आज दी:-२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त पाल वृंदावन धाम आश्रमातील श्री हरिधाम मंदिरात विराजित परम पूज्य सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या समाधी स्थळी सकाळी पाच वाजेला सद्गुरु पादूका पूजन, आरती तसेच दर्शनाला सुरुवात करण्यात आली.त्याचप्रमाणे सकाळी ७ वाजेला गुरुदीक्षा व चैतन्य ध्वजारोहण करण्यात येऊन सकाळी नऊ वाजेपासुन ध्यान, साधना, प्रार्थना , गुरुपुष्पांजली भजन व श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या मुखार विंदतुन सत्संग अमृताचा लाभ मिळाला. त्यानंतर १० वी व १२ वी मध्ये ७० टक्के च्या वर गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार चे विविध समितीचे सत्कार दी २० जुलै रोजी करण्यात आले.. त्याचप्रमाणे पार्किंग सेवा, आरोग्य सेवा, सत्संग पांडाल, पूज्य बापूजी समाधी दर्शन सेवा,अश्या विविध सेवेमध्ये प्रशासनासोबत चैतन्य युवा सेक्युरिटी संघ ने हातभार लावला.या महोत्सवात रावेर आमदार शिरीष चौधरी,धनंजय चौधरी,भुसावळ येथून अनिल चौधरी,माजी खासदार हरिभाऊ राठोड,तहसीलदार बंडू कापसे, पोलिस निरीक्षक विशाल जायसवाल, पाल उपनिरीक्षक सचिन नवले ,आरोग्य दूत रामेश्वर नाईक, सांसद प्रतिनिधि नंदा ब्राम्हणे,आत्माराम जाधव,श्याम चैतन्य,शिव चैतन्य,दिव्य चैतन्य,ब्रज चैतन्य,नवनीत चैतन्य,महेश चैतन्य,राधे चैतन्य,सर्व चैतन्य,ऋषि चैतन्य,शुभ चैतन्य,हरीश चैतन्य,राम चैतन्य,माधव चैतन्य,लालसिंग महाराज आदिसह चैतन्य साधक परिवाराचे विविध समिति चे संचालक व देशभरातून हजारो साधक उपस्थित होते.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील