रावेर मेट्रो मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ला आमदार बच्चू कडू यांची सदिच्छा भेट

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर l रावेर तालुक्यातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे मेट्रो मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल डॉक्टर शब्बीर शेख यांनी नव्याने सुरू केल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. याच रुग्णालयाला आमदार बच्चू कडू यांनी सदिच्छा भेट दिली

Aug 25, 2024 - 18:50
Aug 25, 2024 - 19:55
 0

मुक्ताई  न्यूज नेटवर्क रावेर l

रावेर तालुक्यातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे मेट्रो मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल डॉक्टर शब्बीर शेख यांनी नव्याने सुरू केल्याने रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. याच रुग्णालयाला आमदार बच्चू कडू यांनी सदिच्छा भेट दिली 

 रावेर स्टेशन रोडवरील मेट्रो मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर शब्बीर खान यांनी रुग्णांच्या सेवेसाठी मेट्रो मेट्रो मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ची उभारणी केली असून यामध्ये गरीब रुग्णांना अवेळी येणारा रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळत आहे आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर शब्बीर खान यांनी त्यांचे स्वागत केले तसेच डॉक्टर शहानवाज यांनी प्रहार चे प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांचा सत्कार केला त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष यांचाही सत्कार दवाखान्याकडून करण्यात आला तसेच बच्चू कडू यांचे स्वागत व सत्कार महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांनीही केला आमदार बच्चू कडू यांनी संपूर्ण दवाखान्याची पाहणी करत समाधान व्यक्त केले आपल्याला काही मदत लागली तर सांगा असे यावेळी डॉक्टर शब्बीर शेख यांना सांगितले.

यावेळी डॉक्टर शब्बीर शेख, सीनियर प्रॅक्टिशियन, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शेख मेहमूद, डॉ.अबरार,दंतवैद्य डॉ.रुबिना,स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ डॉ अमित, भूलतज्ञ डॉ.योगिनी खत्री,स्त्रीरोगतज्ञ,समीर शेख,फार्मासिस्ट हॉस्पिटलच्या सिस्टर व वॉर्ड बॉय. यांच्यासह नागरिक उपस्थित होते व सूत्रसंचालन भोला भाऊ यांनी केले

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील