महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना रावेर प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना रावेर प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना रावेर प्रचार रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क
रावेर लोकसभा साठी महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचार रॅलीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करून प्रचार रॅली सुरुवात करण्यात आली.
प्रचार रॅलीमध्ये महालक्ष्मी मंदिर पाराचे गणपती मंदिर आवजी सिद्ध महाराज मंदिर येथे दर्शन घेऊन श्री छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत प्रचार रॅली जल्लोषात काढण्यात आली
रॅलीत मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात व तुतारी च्या सानिध्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मेन रोड तसेच नालाभाग छत्रपती शिवाजी चौक महात्मा फुले चौक भोईवाडा गांधी चौक रथगल्ली पाराचा गणपती परिवर्तन चौक अशा मुख्य रस्त्यावरून प्रचार रॅली काढून श्रीराम पाटील यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी उमेदवार श्रीराम पाटील यांनी नागरिकांना केले यावेळी उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट,काँग्रेस आय व शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते