कर्मभूमी रावेर श्रीराम पाटील यांच्या पाठीशी : प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्मभूमी रावेर श्रीराम पाटील यांच्या पाठीशी : प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 10, 2024 - 23:56
 0
कर्मभूमी रावेर श्रीराम पाटील यांच्या पाठीशी : प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताई वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी /रावेर 

रावेर म्हणजे उद्योजक श्रीराम पाटील यांची कर्मभूमी याच शहरात अक्षयतृतीयेच्या दिवशी महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी शहरातील मतदारांनी स्वयंस्फूर्तीने प्रचार फेरीत सहभागी होत श्रीराम पाटलांच्या विजयाचा नारा दिला. रावेर शहरातून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी मतदारांनी व्यक्त केला. 

रावेर ही श्रीराम पाटील यांची कर्मभूमी आहे. व्यवसायाचा श्रीगणेशा त्यांनी रावेरमधूनच करीत ते या क्षेत्रात यशस्वी होत आज यशस्वी उद्योजकांपर्यंन्त पोहचले आहे. त्यांच्या यशाचे साक्षीदार रावेरमधील तमाम जनता आहे. श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट )पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली . माजी आमदार अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद जाफर मोहम्मद, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी प्रल्हाद महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख योगीराज पाटील, हरीश गनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी दीपक पाटील, योगेश गजरे, राजीव सवर्णे, जगदीश घेटे, मेहमूद शेख, सोपान साहेबराव पाटील, योगेश पाटील, सादिक मेंबर, डॉ सुरेश पाटील, डी एस चौधरी, शीतल पाटील, दिलीप कांबळे, सुरेश चिंधू पाटील, दीपक पाटील, विजय गोटीवाले, ज्ञानेश्वर महाजन, गणेश बोरसे, अविनाश पाटील, राकेश घोरपडे, सावन मेढे, मंदार पाटील, गयास शेख, नारायण घोडके, धुमा तायडे, ऍड आर आर पाटील, असद मेंबर,अय्युब मेंबर, उमेश गाढे, सुनील कोंडे, महेश लोखंडे, गयास शेख, युसुफ शेख, प्रल्हाद बोन्डे , यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आपली उपस्थिती नोंदवली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून प्रचार फेरीला सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी काढण्यात आली . जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बोरकर, पीपल्स आर्मीचे असंख्य कार्यकर्ते आणि अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील