शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे म्हणून 22 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय मोर्चाचे रावेर येथे आयोजन
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळावे म्हणून 22 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय मोर्चाचे रावेर येथे आयोजन
मुक्ताई वार्ता
न्यूज नेटवर्क रावेर
रावेर, यावल,चोपडा, मुक्ताईनगर सह जिल्ह्यातील सर्व केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांना त्यांच्या विम्याचे हक्काचे पैसे मिळावे या मागणीसाठी रावेर येथील छोरीया मार्केट ते रावेर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सोपान बाबुराव पाटील यांनी शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे व आपल्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी आंदोलन स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे यासाठी सोपान पाटील व किशोर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार बंडू कापसे व कृषी अधिकारी यांची तहसील कार्यालयात भेट घेऊन चर्चाही केली