कर्जोंद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रिशाद बी यांची बिनविरोध निवड
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- कर्जोंद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रिशाद बी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :-
रावेर तालुव्यातील कर्जोंद ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रिशाद बी शेख बशीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवड होताच समर्थानी फटाके फोडुन जल्लोष केला.
कर्जोद ग्रामपंचायत सरपंच सुरेखा विनोद सावळे यांनी ठहरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनामेमुळे सदर जागा ही रिक्त झाली होती त्यामुळे दि ९ रोजी सोमवारी कर्जोंद ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणुक घेणयात अली यात रिशाद बी शेख बशीर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यने निवडणुक निर्णय अधिकारी यासीन तडवी यांनी रिशाद बी शेख बशीर यांची बिनविरोध निवड घोषीत केली.
आपल्यावर नागरिकांनी विश्वास ठेवल्याने त्या विश्वासवासाला तडा देऊ जाऊ देणार नाही व गावाचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रिशाद बी यांनी सांगितले आहे
या प्रसंगी अशोक वनारे,नरेंद्र महाजन,अरुणा महाजन,सुलभा महाजन,सविता महाजन,रेखा ससाणे हाजी सरफराज,वलिमत तडवी,शेख शकिल भाई,अशिष पाठक, इमरान शेख, आदि नागरिक मोठया संख्याने उपस्थित होते