रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक, कारवाईने तालुक्यात खळबळ

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक, कारवाईने तालुक्यात खळबळ

Jun 12, 2024 - 22:48
 0
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाला दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक, कारवाईने तालुक्यात खळबळ

मुक्ताई न्युज नेटवर्क ।

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन चे पोलिस उप निरीक्षक यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने रावेर तालुक्यासह निंभोरा परिसरात मोठी  खळबळ उडाली आहे.

रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उप निरीक्षक कैलास ठाकूर यांना १२ जून बुधवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांना लासलुजपत विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत घेऊन जळगाव कडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

हे कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील