इंडियन मेडिकल असोसिएशनचा जळगाव जिल्हा बंदला पाठिंबा तर 17 शनिवार रोजी दवाखाने राहणार बंद
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदुंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत त्याचा निषेध म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदुंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत त्याचा निषेध म्हणून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
बांगलादेशात हिंदूंवर व त्यांच्या मंदिरांवर पूर्वनियोजित कटानुसार त्यांच्या हत्या करून त्यांना देशातून विस्थापित करण्याचे कारस्थान चालू आहे.या अत्याचारांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने 16 ऑगस्ट शुक्रवार रोजी ' जळगाव बंद' चे आह्वान केले आहे. त्याला आम्ही IMA ताप्ती व्हॅली (रावेर, सावदा, फैजपूर आणि यावल) या बंद ला पूर्ण पाठींबा देऊन अन्यायात बळी पडलेल्या नागरिकांबाबत आमच्या संवेदना व्यक्त करीत आहोत.
बंगालमधील कलकत्त्यात मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या निवासी महिला वैद्यकीय अधिकारी यांच्यावर झालेल्या अत्याचार व खून यासाठी निषेध म्हणून उद्या 17 ऑगस्ट शनिवार रोजी दवाखाने बंद ठेवणार आहे यासाठीचे निवेदन तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले आहे परंतु आपातकालीन वैदकीय सेवा चालू राहील
यावेळी आयएमएचे सचिव डॉ. मिलिंद वानखेडे डॉ सुरेश पाटील डॉ संदीप पाटील डॉ शांताराम पाटील डॉ ताराचंद सावळे डॉ डिगंबर पाटील डॉ योगेश पाटील डॉ चंद्रदीप पाटील डॉ सुरेश महाजन डॉ मीनल दलाल डॉ योगिता पाटील डॉ.प्रीती सावळे डॉ. हर्षा पाटील यांच्यासह रावेर शहरातील डॉक्टर उपस्थित होते