इतिहासात प्रथमताच कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याने केले ध्वजारोहण, सभापती सचिन पाटील यांनी दिला शेतकऱ्याला मान
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर :- इतिहासात प्रथमताच कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याने केले ध्वजारोहण, सभापती सचिन पाटील यांनी दिला शेतकऱ्याला मान
मुक्ताई न्यूज नेटवर्क रावेर
शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी झटणारी संस्था म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती यामध्ये 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी सभापती सचिन पाटील यांचा मान असल्यावरही त्यांनी सामान्य शेतकऱ्याकडून ध्वजारोहण करून घेतल्याने शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वतंत्र दिनानिमित्त सभापती सचिन पाटील यांच्या म्हणण्यानुसार पातोंडी येथील शेतकरी श्रीराम गबाजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याने शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. शेतकऱ्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला.शेतकऱ्याला प्रथमतः अशी ध्वजारोहणाची संधी दिल्यामुळे शेतकऱ्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचि संधी मिळाली असे सभापती सचिन पाटील यांनी सांगितले.
यावेळी सभापती सचिन पाटील उपसभापती योगेश पाटील संचालक राजेंद्र चौधरी,सिकंदर तडवी संचालिका कविता दिनेश पाटील मनीषा सोपान पाटील, सोपान साहेबराव पाटील, छोटू पाटील, सचिव गोपाळ महाजन सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते