राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हानपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण आधीच्या मूळ मार्गानेच करण्यात यावे, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभागीय अधिकारी, भोपाळ/नागपूर यांना सूचना...*
राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हानपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण आधीच्या मूळ मार्गानेच करण्यात यावे, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभागीय अधिकारी, भोपाळ/नागपूर यांना सूचना...*
मुक्ताई वार्ता न्यूज
नेटवर्क रावेर
बुऱ्हानपूर-अंकलेश्वर* राष्ट्रीय महामार्ग एनएच७५३बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा *तळोदा - शिरपूर - चोपडा - यावल - फैजपूर - सावदा - रावेर* या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २४० किमी महामार्गाच्या चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच *रावेर व सावदा* शहरातून करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील व मंत्री श्री.गिरीषजी महाजन* यांच्या मार्फत *भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभागीय अधिकारी, भोपाळ व नागपूर* याच्याकडे केली.
*बुऱ्हानपूर-अंकलेश्वर* महामार्गाच्या दर्जावाढ व चौपदरीकरणसाठी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांचा मागील काही वर्षापासून केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित मंत्री यांच्याकडे निरंतर पाठपुरावा सुरु होता, त्यानुसार मागील वर्षी सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आलेले असून, सध्या देखभाल दुरुस्तीसाठी *रु.६१.०० कोटी निधी* वितरीत करण्यात आलेला असून, चौपदरीकरणसाठी डीपीआर तयार झालेला असून, सदर मार्ग *मुक्ताईनगर* तालुक्यातून जाणार असून, रावेर व सावदा शहरास चौपदरीकरण मध्ये वगळण्यात असल्याची अफवा पसरविण्यात आली असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. परंतु सदर मार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून न घेता स्थानिकांच्या मागणीनुसार आधीच्या मूळ मार्गानेच *रावेर व सावदा* शहरातून घेण्यात यावा यासाठी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी* यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली असता, त्यांच्या आदेशानुसार आज दि.०५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे *भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभागीय अधिकारी, भोपाळ व नागपूर* यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बुऱ्हानपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण आधीच्या मूळ मार्गानेच करण्यात यावा तसेच सध्या चालू असलेली देखभाल दुरुस्ती वेग वाढविण्याबाबत संबधित कंत्राटदारास सुद्धा सूचना *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी सदर बैठकीत केल्या.
यावेळी पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री श्री.गिरीष महाजन, मंत्री श्री.अनिल पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार श्री. सुरेश भोळे, आमदार श्री.संजय सावकारे, आमदार श्री.किशोर पाटील, आमदार सौ.लता सोनवणे, आमदार श्री.मंगेश चव्हाण, आमदार श्री.चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद ई. प्रमुख उपस्थितीत होते.