अंकलेश्वर-बर्‍हाणपूर चौपदरी महामार्ग रावेर खानापूर चोरवड मार्गेच व्हावा या मागणीसाठी महामार्ग बचाव समितीतर्फे रास्तारोको आंदोलन

अंकलेश्वर-बर्‍हाणपूर चौपदरी महामार्ग रावेर खानापूर चोरवड मार्गेच व्हावा या मागणीसाठी महामार्ग बचाव समितीतर्फे रास्तारोको आंदोलन

Dec 29, 2023 - 23:51
 0
अंकलेश्वर-बर्‍हाणपूर चौपदरी महामार्ग रावेर खानापूर चोरवड मार्गेच व्हावा  या मागणीसाठी महामार्ग बचाव समितीतर्फे  रास्तारोको आंदोलन

मुक्ताई माता न्यूज

नेटवर्क रावेर 

अंकलेश्वर-बर्‍हाणपूर चौपदरी महामार्ग रावेर खानापूर चोरवड मार्गेच व्हावा या मागणीसाठी महामार्ग बचाव कृती समितीतर्फे   रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

रावेर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे येथे दुपारी बारा वाजता महामार्गावर महामार्ग बचाव सिमिती मार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्या विरुध्द जोरदार घोषणा देण्यात आला.सुमारे एक तासाच्या वर महामार्ग रोखुन धरला होता. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठी वाहतूक ठप्प झाली होती

यावेळी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या बद्दल नागरीकांनी प्रचंड रोष व्यक्त केला.खासदार यांनी रावेर तालुक्यात कोणतीच विकास कामे केलीच नाही.याउलट बुऱ्हानपूर अंकलेश्वर रावेर सावदा खानापूर चोरवड मुळमहामार्ग बदलवुन मुक्ताईनगर तालुक्यातील गावाकडून वळविल्याने उपस्थित नागरीकांनी रोष व्यक्त करत रास्तारोको आंदोलन करीत जोरदार निर्दशनही केले. 

या रस्त्याला प्रथमता श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक श्रीराम पाटील यांच्या वतीने हात घालून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन रस्ता या मार्गेच व्हावा अशी मागणी सुरुवातीलाच करण्यात आली

या आंदोलनात आलेल्या अंतुरली येथील शेतकऱ्यांनी आमच्याकडे अल्पभूधारक शेती असून ही जर शेती या रस्त्यात गेले तर आम्ही पुढे करायचं काय यापासून मिळणारा हा मोबदला खूपच कमी असून आमचा या सरकारवर विश्वास नाही असेही यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवले तर हा रस्ता रावेर खानापूर मार्गे जावा अशी आमची मागणी आहे आणि याला आमचा पाठिंबाही आहे असे सांगितले

रावेर तालुक्यातुन मुळमार्गाने जाणारा महामार्ग वळवुन मुक्ताई नगर तालुक्यात नेला म्हणून रोष व्यक्त करण्यात आला. तसेच महामार्गावर पडलेले खड्डे निकृष्ट पध्दतीने बुजवण्यात आले असून एका महीन्यात पुन्हा खड्डे पडल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.अखेर NHAI चे अधिकारी चंदन गायकवाड आंदोलनस्थळी येऊन महामार्ग मुळमार्गानेच करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेश पाटील शिवसेनेचे योगीराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश महाजन जयेश कुयटे यांच्यासह

मोठ्या संख्येने रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी नागरिक उपस्थित होते

muktainews मुक्ताई न्यूज हे रावेर तालुक्यातील पहिले न्यूज नेटवर्क असून आता 2023 पासून डिजिटल युगात वाचन प्रेमींना नव नविन बातम्या, घडणाऱ्या घडामोडी, मिळाव्या अशी जनतेची अपेक्षा असते म्हणुन डिजीटल माध्यमाच्या स्वरुपात मांडणी केलीय सन 2000 या वर्षा पासुन केबल टीव्ही च्या माध्यमातून सेवा बजावत असुन वाचनप्रेमी व जाहिरातदारांच्या शुभेच्छांरूपी प्रेमाच्या जोरावर "भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा कर्दन काळ ठरून प्रखड व निर्भिर्ड" पणे पुढेही असेच कार्य सुरू ठेऊ त्यासाठी आपली सोबत अशीच राहू द्या. धन्यवाद. संपादक प्रवीण पाटील