भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन रावेर तहसील कार्यालयात साजरा तहसीलदार बंडू कापसे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न
रावेर-मुक्ताई न्यूज नेटवर्क । भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रावेर तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तहसीलदार बंडू कापसे यांनी प्रशासकीय कार्यालयात सकाळी ९ वाजता ध्वजारोहण केले.
रावेर-मुक्ताई न्यूज नेटवर्क ।
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रावेर तहसील कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तहसीलदार बंडू कापसे यांनी प्रशासकीय कार्यालयात सकाळी ९ वाजता ध्वजारोहण केले. यावेळी उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सलामी देत राष्ट्रगीत गायिले.सर्वांनी एकत्रितरित्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना अभिवादन केले आणि देशाच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचे वचन दिले. तसेच एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी अप्पर तहसीलदार मयूर कळसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांसह अनेक प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, डॉ. सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी शेतकरी नेते सुरेश चिंधू पाटील,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष महेमूद शेख, उमाकांत महाजन, राजन लासुरकर, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .