गणेश विसर्जनादरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे तरुण तलावात बुडाला , शोध कार्य सुरू
गणेश विसर्जनादरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे तरुण तलावात बुडाला , शोध कार्य सुरू
मुक्ताई वार्ता रावेर
न्यूज नेटवर्क रावेर
अनंत चतुर्दशी निमित्त सर्वत्र जळगाव जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यासाठी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र काल सायंकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा गावातील एका पाझर तलावात गणेश विसर्जन दरम्यान ३० वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रात्री उघडकीस आली. मात्र अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्याने आज सकाळपासून प्रशासनातर्फे बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे.
फिरीश खा पवार वय ३० रा हलखेडा ता. मुक्ताईनगर असे बुडालेल्या तरुणाचे नाव समोर आले असून आज २९ रोजी सकाळपासून पाझर तलावात त्याचा प्रशासनातर्फे शोध घेतला जात आहे.