सावदा येथे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रॅव्हल आणि ट्रक यांची समोरासमोर धडक चालकासह तेरा वर्षीय बालक जखमी
सावदा येथे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर ट्रॅव्हल आणि ट्रक यांची समोरासमोर धडक चालकासह तेरा वर्षीय बालक जखमी
सावदा येथे बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील खंडेमय रस्त्यामुळे पुन्हा संध्याकाळी 7. 30 वाजता सावदा शहरा जवळील साईबाबा मंदिराजवळ खाजगी ट्रॅव्हल आणि ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. खाजगी बस मध्ये 18 प्रवासी असल्याचे समजते यापैकी खाजगी बस चालक यांना फैजपूर आशीर्वाद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असुन प्रवाशांपैकी किरकोळ जखमी यांच्यावरही उपचार सुरू आहे
बसेस समोरच्या भागाचा पूर्ण चकणाचुर झाल्या असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
जमली त्यामुळे ट्राफिक थोडा वेळ जाम झाल्यामुळे सावदा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आले यावेळी सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, देवेंद्र पाटील, यशवंत टाकळे, पोलीस कॉन्स्टेबल कुरकुरे, पोलीस कॉन्स्टेबल संजय चौधरी, गृह रक्षक दलाचे जवान यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली जेसीबीच्या साह्याने खाजगी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स बाजूला करण्यात आली